NTA विरोधात अभाविपचे पुणे विद्यापीठ परिसरात छात्ररोष आंदोलन

विद्यापीठ परिसरामध्ये नोंदवला निषेध

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेच्या वतीने यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या विरोधात विद्यापीठ परिसरामध्ये ‘छात्ररोष आंदोलन’ करण्यात आले. 18 जून 2024 रोजी NTA (National Testing Agency) च्या माध्यमातून यूजीसी – नेट ही परीक्षा घेण्यात आली. एका दिवसातच म्हणजेच 19 जून 2024 रोजी NTA च्या संकेतस्थळावरून घेतलेली परीक्षा रद्द करत असल्याची सूचना जाहीर करण्यात आली, या विरोधात हे आंदोलन केले गेले. आंदोलनामध्ये NTA च्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

Advertisement

NTA च्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर यूजीसी-नेट परीक्षा रद्द होणे हे चिंताजनक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या विषयात देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये निषेध नोंदवला आहे.

या प्रकरणाची तशीच NTA ची तात्काळ CBI चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली पाहिजे व परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलली पाहिजेत’, असे प्रतिपादन पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी केले.

तसेच, ‘NTA च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा जर सुलभरित्या झाल्या नाहीत तर अभाविप देशभरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करेल’, असा इशारा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page