डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विषयात आरती खांबेकर प्रथम

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या एम ए पदव्युत्तर परीक्षा २०२३- २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. विभागाचा निकाल ७५ टक्के लागला असून ५४ विद्यार्थी प्रथम तर २१ टक्के विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेत आरती श्यामल खांबेकर यांनी ७९ टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक एकता राठोड (७८.५ टक्के ) तर तृतीय क्रमांक शशी मोहन शिरसाट यास (७८.२ टक्के) गुण मिळाले. गुणवंत विद्यार्थ्यांचे विभागप्रमुख डॉ संजय साळुंके, प्रा एल एच साळोक, प्रा पी एन सहारे, प्रा डॉ एस व्ही गुंजाळ, डॉ एस एन बागवान यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com