उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख होते. केसीआयएल चे संचालक डॉ राजेश जवळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ गोपाल चव्हाण व चिराग मराठे (आयआयटी, मुंबई) यांनी मार्गदर्शन केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयातील विविध शाखांच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता उपक्रमासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये कसे प्रशिक्षण देता येईल याबाबत चर्चा झाली. डॉ जवळेकर यांनी याबद्दल माहिती दिली. ‘आपले प्रश्न आणि आपले विज्ञान’ यावर चिराग मराठे विस्तृत सादरीकरण केले. समन्वयक डॉ के बी पाटील, प्रा बी सी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.