देवगिरी महाविद्यालयात संशोधन पध्दतीवर कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय समाजशास्त्र विभागाद्वारा एकदिवसीय आताविद्याशाखीय राष्ट्रीय कार्यशाळा ‘संशोधन पद्धती : तंत्रे आणि साधने” या विषयावर दिनाक ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजन केले होते. कार्यशाळेचे उट्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठता, प्रो महेंद्र शिरसाठ यांच्या हस्ते झाले, अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यशाळेचे संयोजक डॉ. दिलीप खैरनार यांनी केले त्यांनी सदर कार्यशाळा संशोधकासाठी किती उपयुक्त आहे हे प्रतिपादित करून कार्यशाळा आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रो महेंद्र शिरसाठ यांनी संशोधन चौकटीमध्ये संशोधन करणे महत्वपूर्ण असते हे प्रतिपादित करुन प्रत्येक संशोधकाने संशोधन सहिता प्रमाण मानूनच संशोधन करणे गरजेचे आहे असे सागितले तसेच त्यांच्या व्याख्यानातून संशोधकीय पेपर कसा लिहावा यासंदर्भात मार्गदर्शन केले.
उद्घाटकीय समारभाचे अध्यक्ष प्रो अशोक तेजनकर यांनी देवगिरी महाविद्यालयाची संशोधकीय वाटचाल सांगून सर्व संशोधकांना संशोधनाच्या माध्यमातून महाविद्यालयाचे नाव उंचावेल असे संशोधन करावे असे मत प्रतिपादन करून संशोधनात्मक समस्या कशी मांडावी हे सांगितले. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात प्रोफेसर दिलीप खैरनार यांनी “संशोधनात्मक उद्दिष्टे ,संशोधन साहित्याचा आढावा ,संकल्पनीकरण” यावर विस्तृत स्वरूपाची मांडणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला दुपारच्या सत्रात प्रो आर. ई. मार्टिन, विभाग प्रमुख, प्राणीशास्त्र विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, यांनी “गृहीतकांची मांडणी ,परीक्षण व तांत्रिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले. श्री निहाल माळी यांनी “जे गेट चा संशोधनातील वापर यावर व्याख्यान दिले तर राहुल बिंगे , सांख्यिकीतज्ञ,साउथ एशिया, यांनी “स्टॅटिस्टिकल पॅकेज ऑफ सोशल सायन्स” चा संशोधनात सांख्यिकीय विश्लेषणासाठी कसा वापर करता येईल यासंदर्भात ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. कार्यशाळेच्या आयोजना करता डॉ. पी. टी.बाचेवाड, तन्मय भावसार, सुरज गायकवाड, अविनाश साळवे, देवदत्त कदम, पुष्पराज साबळे, वैभव घुले, राम थोरवट, मुदिता, मंजिता कुलकर्णी, यांनी परिश्रम घेतले.