दत्ताजीराव कदम महाविद्यालयात जाहिरात कौशल्यांचा विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न
भाषेच्या सुजनशीलतेचा अविष्कार म्हणजे जाहिरात कौशल्य – डॉ. कल्पना गंगातीरकर
इचलकरंजी : डी. के .एस. सी. महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजनेअंतर्गत जाहिरात कौशल्यांचा विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना डॉ. कल्पना गंगातीरकर यांनी जाहिरात कौशल्य विकसित करण्यासाठी सृजनशीलतेची गरज असते असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य एस् एम्. मणेर यांनी सध्याचे युग हे जाहिरातीचे युग असून याबाबतची कौशल्ये आत्मसात करून विकसित करण्यासाठी अश्या कार्यशाळेची गरज आहे जेणेकरून विध्यार्थ्यांना या क्षेत्रातील उद्योग व संधीची माहिती मिळेल असे मत अध्यक्ष्यस्थानावरून बोलताना व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.सुनिता वेल्हाळ यांनी केले व प्रास्ताविक कार्यशाळेच्या संयोजक डॉ. प्रभा
पाटील यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. संदीप हरगाणे यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रातील प्रमुख वक्त्या डॉ. कल्पना गंगातीरकर यांनी जाहिरातींचे प्रकार आणि त्या तयार करण्यासाठी भाषेचा अलंकारीक, आकर्षक सृजनशील वापर कसा करावा. याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये तज्ञ मार्गदर्शक रेडिओ शुगर 90.8 च्या मॅनेजर धनश्री कुलकर्णी यांनी रेडीओवर प्रसारित होणाऱ्या जाहिराती कश्या असतात व कश्या लिहल्या जातात हे प्रात्यक्षिकासहित विषद केले. तसेच सहभागी विद्यार्थी विद्यार्थीनींना जाहिरातीचे लिखाण व सादरीकरण उदाहरणादाखल करण्याची संधी दिली.
या कार्यशाळेला सुमारे 75 विद्यार्थी-विद्यार्थीनीं सहभागी झाले. या कार्यशाळेचे नियोजन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनिता वेल्हाळ यांनी केले व संयोजक म्हणून डॉ. प्रभा पाटील यांनी काम पाहीले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रा. संदीप हरगाणे, प्रा. दिपक देवकर, प्रा. कु. अर्चना नंदगावे , प्रा. कु. श्रद्धा बरगाले यांनी सहकार्य केले तसेच इंग्रजी विभागातील विद्यार्थीनी अक्षता कर्ड्यालकर, कोमल ठोंगे, रिया वाठारे, श्रेया मोळे, विजयालक्ष्मी पंग, अवंतिका खराडे यांनी स्वयंसेवक म्हणून मदत केली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अग्रणी महाविद्यालय प्रमुख डॉ. पद्मश्री वाघमारे यांचे सहकार्य लाभले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस् एम्. मणेर याचे मार्गदर्शन लाभले.