शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे अनुभवाधारित अध्यापनशास्त्रावर दोन दिवसीय कार्यशाळा
कौशल्यांच्या कक्षा वाढविण्याची गरज – डॉ. शिरीष शितोळे
कोल्हापूर | २९ डिसेंबर २०२५ : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (PM-उषा) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिक्षणशास्त्र अधिविभागात शिक्षक व प्राध्यापकांसाठी “अनुभवाधारित अध्यापनशास्त्र” या विषयावर दिनांक २९ व ३० डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन सत्रात डॉ. शिरीष शितोळे यांचे मार्गदर्शन
या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती व प्रमुख व्याख्याते म्हणून महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील डॉ. शिरीष शितोळे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी “उच्च शिक्षणातील आंतरराष्ट्रीयकरण साध्य करण्यासाठी विचार प्रक्रियेमध्ये जुन्या व नव्या कौशल्यांच्या कक्षा वाढविण्याची नितांत गरज आहे” असे प्रतिपादन केले.

अनुभवाधारित अध्यापनशास्त्राचे महत्त्व
शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात अनुभवाधारित अध्यापनशास्त्र शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक व उपयुक्त ठरत आहे.
कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. रुपाली संकपाळ यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे आयोजन व सहभाग
या कार्यशाळेत:
- डॉ. अंजली गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला
- बी.एड./एम.एड. प्रशिक्षणार्थी पूजा कांडपाल यांनी सूत्रसंचालन केले
- श्रीमती कादंबरी खांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले
उपस्थित मान्यवर व शिक्षकवर्ग
कार्यशाळेसाठी पुढील मान्यवर उपस्थित होते:
- डॉ. विद्यानंद खंडागळे
- डॉ. सुप्रिया पाटील
- श्रीमती सरस्वती कांबळे
- श्रीमती सारिका पाटील
- डॉ. विजय सदामते
- संशोधक विद्यार्थी
तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षक व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
