महात्मा गांधी मिशन (MGM) विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय हिंदी परिषदेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, : महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील भारतीय तथा विदेशी भाषा संस्थेच्या वतीने ग़ज़लकार दुष्यंत कुमार यांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय हिंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, दि. ४ आणि सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

‘पूरा रदीफ़, अधूरा क़ाफ़िया’ या विषयावर होणाऱ्या या परिषदेत दुष्यंत कुमार यांच्या साहित्यिक योगदानावर अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. परिषदेचे उद्घाटन पद्मश्री विजयदत्त श्रीधर यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध ग़ज़लकार आलोक त्यागी, प्रदीप निफाडकर, कमलेश भट्ट कमल, प्रो. वशिष्ठ अनूप, राजेश बादल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रविवार, दि. ४ जानेवारी रोजी ‘पीर पर्वत-सी’ या दुष्यंत कुमार यांच्या ग़ज़लांची विशेष संगीत प्रस्तुती प्रो. डॉ. संजय मोहड सादर करणार आहेत. या परिषदेसाठी नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. शहनाज बासमेह आणि प्रा. डॉ. सुरेखा लक्कस यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
