‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये खा वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि २७ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हाचे खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खा वसंतराव चव्हाण यांचे दि २६ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले होते.

Advertisement

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ संतराम मुंढे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डी एम खंदारे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी यांची विशेष उपस्थिती होती.

खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page