सौ के एस के महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
बीड : पर्यावरणाचे रक्षण व संगोपन ही काळाची गरज आहे. वृक्ष हे मानवासाठी अत्यंत उपयोगी असून विद्यार्थी व समाजामध्ये वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व व उपयोगीता समजावून सांगितली. जो पर्यंत या पृथ्वी तलावर वृक्ष आहेत. तोपर्यंत मानव आणि तत्सम जीव हे तग धरून राहतील. वृक्ष नसतील तर पृथ्वी तलावरील जीवसृष्टी नष्ट होईल हे वास्तव आपण समजवून घ्यायला पाहिजे म्हणून प्रतिवर्षी एक व्यक्ती एक झाड लावलेच पाहीजे असेही त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर,संस्थेचे पदाधिकारी डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, पर्यावरणशास्त्र समितीचे प्रमुख डॉ पी बी सिरसट, हे उपस्थित होते. वृक्ष लागवड करण्यासाठी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.