आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे विश्रामगड येथे वृक्षरोपण व प्लास्टिकमुक्त अभियान संपन्न
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विश्रामगड (ता अकोले) येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण व प्लास्टीक मुक्त परिसराकरीता अभियान राबविण्यात आलेे. या उपक्रमात शंभरपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), प्रति-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, वित्त व लेखा अधिकारी एन व्ही कळसकर, हरित कक्षाचे प्रमुख डॉ सुनील फुगारे, क्रीडा समितीचे अध्यक्ष अॅड संदीप कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षरोपण व वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण व प्लास्टीक मुक्त परिसराकरीता काम करण्यासाठी सर्वांनी घेतलेला सहभाग उर्जा देणारा आहे. विद्यापीठाने प्लास्टिक मुक्त कॅम्पस ही संकल्पना यशस्वी केली आहे. ही मोहिम राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयात टप्याटप्याने सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रति-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, प्लास्टिकच्या अतिवापराने निसर्गाची हानी होत आहे. निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी खारीचा वाटा म्हणून काम करण्याची संधी या ट्रेकच्या माध्यमातून मिळाली असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धन व गडावरील वाटेतील प्लॅस्टिक वस्तूंचे संकलन करून निसर्गाची जोपासना करण्याचा प्रयत्न ट्रेकच्या माध्यमातून करण्यात आला. निसर्गाची जोपासना करण्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष अॅड संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, धामणगांव येथील एस एम बी टी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप भाबड, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ किरण जगताप, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कविता मातेरे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ योगेश उशीर, उपअधिष्ठाता डॉ धनाजी जाधव, मुख्य प्रशासकीय अधिकारी हितेश माधवानी, प्रशासकीय अधिकारी डॉ जितेश ठाकूर, सुरक्षा अधिकारी अमोल पावसे यांच्या विशेष सहकार्याने ही मोहिम राबविण्यात आली. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
या ट्रेकमध्ये विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्निल तोरणे, संदीप राठोड, राजेंद्र शहाणे, वाय जी पाटील, मधुकर भिसे सहभागी झाले होते. या ट्रेककरीता योगेश राऊत, विराज भोगले, संदीप ततार, निलेश ओहोळ, नंदकिशोर वाघ, दिनेश चव्हाण, प्रशांत पवार, पुष्कर तर्हाळ यांनी परिश्रम घेतले.
या ट्रेकमध्ये विद्यापीठातील शंभरपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी सहाभागी झाले होते.