देवगिरी महाविदयालयाची आदर्श गाव राळेगणसिध्दी येथे अभ्यास सहल संपन्न
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत, देवगिरी महाविद्यालयातील, समाजशास्त्र विभागाची अभ्यास सहल दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी आदर्श गाव राळेगणसिध्दी अभ्यास सहलीमध्ये ‘स्वयंसेवी संस्था आणि विकास’ या अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विविध विभागातील 90 विद्यार्थी अभ्यास सहलीत सहभागी झाले. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या आदर्श नेतृत्वाने ग्रामीण ,सांस्कृतिक विकासात संपन्न व आदर्श झालेल्या राळेगणसिद्धी या गावातील ग्रामीण विकासाच्या विविध कामाची पहाणी विद्यार्थांनी केली या मध्ये पाणी व्यवस्थापन ,कोल्हापुरी बंधारे, आदर्श शाळा, ऊर्जा व्यवस्थापन याचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून, ग्रामीण विकास व देशासमोरील विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले व त्यांचे समाधान अण्णां हजारे यांनी केले. ही अभ्यास सहल यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलीप खैरनार यांनी मार्गदर्शन केले. विभागाचे डॉ. पी. टी. बाचेवाड प्रा. तन्मय भावसार, सुरज गायकवाड, पुष्पराज साबळे, भगवान सोळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.