राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विषयांवर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे |

महाराष्ट्र राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर विचारमंथन करण्यासाठी एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख कसे करता येईल, याबाबत धोरणात्मक स्तरावर सखोल चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

A state-level workshop was organized on topics related to universities in the state; it was inaugurated by Minister Chandrakant Patil.
A state-level workshop was organized on topics related to universities in the state; it was inaugurated by Minister Chandrakant Patil.

या कार्यशाळेच्या निमित्ताने उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फ्लिबनेट केंद्र, गांधीनगर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. यावेळी इन्फ्लिबनेटच्या संचालिका प्रा. डॉ. देविका मदल्ली उपस्थित होत्या.

या सामंजस्य कराराअंतर्गत राज्य संस्थात्मक क्रमवारी प्रणाली (State Institutional Ranking System) आणि राज्य उच्च शिक्षण माहिती व्यवस्थापन प्रणाली (State Higher Education MIS) या एकात्मिक वेब-आधारित प्रणालींची रचना व विकास करण्यात येणार आहे. यामुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता, पारदर्शकता आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

A state-level workshop was organized on topics related to universities in the state; it was inaugurated by Minister Chandrakant Patil.

राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी मानवी भांडवल, अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षणाधारित ज्ञान अर्थव्यवस्था या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीबाबत अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या अंमलबजावणीचा आढावा सादर केला, तर राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड यांनी विद्यापीठांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच राज्य संशोधन निधी, महाज्ञानदीप प्रकल्प, पीएम उषा आणि सीएम उषा योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com