एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात नेत्ररोगावर आधारित विशेष चर्चासत्र संपन्न
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम रुग्णालयातील नेत्ररोग विभागाच्यावतीने ‘कीपिंग पेस विथ कॅटरॅक्ट’ संकल्पनेवर आधारित एका विशेष चर्चासत्राचे द्योतन सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या विशेष चर्चासत्रामध्ये राज्यातील १६० नेत्ररोग तज्ञ, नेत्रचिकित्सक आणि आरोग्य व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ प्रवीण सूर्यवंशी, डॉ एच आर राघवन, नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ सारिका गाडेकर व सर्व संबंधित उपस्थित होते.
या एकदिवसीय चर्चासत्रामध्ये या क्षेत्रातील आघाडीचे तज्ञ आणि चिकित्सकांनी मोतीबिंदू निदान आणि उपचारातील प्रगती आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा चर्चा केली. यामध्ये, मोतीबिंदू काढण्यासाठी नवीनतम शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, इंट्राओक्युलर लेन्स तंत्रज्ञानातील नवकल्पना, मोतीबिंदूच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचे व्यवस्थापन, पोस्ट ऑपरेटिव्ह काळजी आणि परिणाम आदि विषयांचा समावेश होता. आधुनिक नेत्ररोग अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांचा समावेश असलेली अशी माहितीपूर्ण सत्रे भविष्यकाळातही आयोजित करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या चर्चासत्रामध्ये डॉ चित्रा रामामुर्थी, डॉ अनघा हिरोर, डॉ संतोष अग्रवाल, डॉ शुभा झंवर, डॉ इम्रान देशमुख, डॉ सुषमा कुलकर्णी, डॉ सारिका गाडेकर, डॉ सुप्रिया देशपांडे आदि तज्ञ डॉक्टरांनी आपले विचार मांडले.
एमजीएम रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागातील डॉ जे पी मिश्रिकोटकर, डॉ प्रज्ञा देशमुख, डॉ स्नेहल ठाकरे, डॉ सुवर्णा बेलापूरकर, डॉ सुप्रिया देशपांडे, डॉ करण ठक्कर, नेत्र विभागाचे कर्मचारी, निवासी डॉक्टर, विद्यार्थी व सर्व संबंधितांनी हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी आपले योगदान दिले.