‘स्वारातीम’ विद्यापीठात ‘विद्यापीठ प्रशासनात कर्मचाऱ्यांचे योगदान’ या विषयावरील विशेष व्याख्यान संपन्न
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दि १० सप्टेंबर रोजी पुणे येथील सनदी लेखापाल (सिए) यांचे ‘विद्यापीठ प्रशासनात कर्मचाऱ्यांचे योगदान’ या विषयावरील विशेष व्याख्यान विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये संपन्न झाले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर व्याख्यानाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ डी एम खंदारे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आयक्यूएसी संचालक डॉ सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी प्रा सीए डॉ एम एस जाधव यांचा शाल, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. तसेच प्रा जाधव यांच्या विषयी आदर व्यक्त केला.
या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी प्रा सीए डॉ एम एस जाधव यांची विशेष उपस्थिती होती. व्याख्यानामध्ये सर्व शिक्षकेतर सेवकांना एक उत्तम पद्धतीचे मार्गदर्शन, प्रशासनात कोणत्या सुधारणा करण्याचे गरजेचे आहे. प्रशासन हे अत्याधुनिक, लोकाभिमुख आणि विद्यार्थी केंद्रित कशा पद्धतीने होईल. त्याच पद्धतीप्रमाणे शिक्षकांना आपण कशा पद्धतीची मदत करू शकतो. की त्यांना शैक्षणिक काम करण्यास उत्साह येईल शैक्षणिक काम करण्यास मदत होईल त्या दृष्टिकोनातून विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
विद्यापीठाचे प्रशासन हे विद्यापीठाच्या मूल्यांकनात महत्त्वाची भूमिका बजावते. या दृष्टिकोनातून करत असलेल्या कामांमध्ये कोणकोणत्या सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीचं काम कसं करता येईल. याचे विविध पैलू प्रा जाधव यांनी उलगडून सांगितले.
विद्यापीठ प्रशासनात कर्मचारी यांचे योगदान या विशेष व्याख्यानाच्या वेळी आयक्यूएसी चे संचालक डॉ सुरेंद्रनाथ रेड्डी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ विनायक जाधव, उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे, हुशारसिंग साबळे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, उपअभियंता अरुण धाकडे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह विद्यापीठातील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.