”बामु” विद्यापीठाच्या फळबागेतील आंब्याचा ३ लाख ५८ हजार रुपयांचा लिलाव
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यापीठ उद्यान अंतर्गत फळबागेतील १७१ आंबा फळझाडांना बहार आलेला होता. आंबा फळझाडांच्या फळांना जाहीर लिलाव करण्यात आला होता. सदरील आंबा फळांच्या लिलावातून विद्यापीठास उत्पन्न रुपये ३ लाख ५८ हजार रुपये मिळाले आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली.
आंब्याच्या विविध जातीच्या प्रकारामध्ये विद्यापीठ फळबाबेत मुख्यतः केशर, लंगडा, हूर, हापुस इत्यादी प्रकारच्या आंबा फळांच्या जाती आहेत. आंबा फळांचा लिलाव देविदास सलामपुरे, न्यू पहाडसिंगपूरा यांनी घेतला आहे. उद्यानविद्यावेता किशोर निर्मळ हे आहेत. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी पदभार घेतल्यापासून अनेक वेळा फळबागांची पाहणी केली आहे. मॉर्निंग वॉकच्या वेळी दररोज ते संपूर्ण विद्यापीठाला राऊंड मारत असतात.