देवगिरी महाविद्यालयात ताणतणाव विरहित जीवन या विषयावर व्याख्यान संपन्न

विद्यार्थ्यानो व्यसनापासून दूर राहा – डॉ आशीष मोहिदे

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय मानसशास्र विभाग व सक्षम बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मानसोपचार तज्ञ डॉ आशीष मोहिदे यांचे ताणतणाव व्यवस्थापन यावर व्याख्यान आयोजित केले होते. ताण एक प्रकारच्या व्हायरसपासून निर्माण होतो. हा व्हायरस म्हणजे आपले अतार्किक विचार आणि चुकीच्या समजूती. आपल्यासोबत घडणार्या  नकारात्मक घटनाचे आपण मॅग्नीफिकेशन करतो. छोट्या छोट्या गोष्टीला आपण फार गंभीर समजत असतो. खरे तर हेच ताणास कारणीभूत ठरत असते. वास्तव परिस्थिती ताणास कारणीभूत नसून आपण त्या घटनेस कसे प्रतिक्रिया देतो, हे महत्वाचे असते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

हा व्हायरस नष्ट करण्याचे उपाय म्हणजे आपला फोकस बदलणे, म्हणजे स्वतः कडे लक्ष देणे, मागील पुढील विचार न करता एकदम निर्णय घेण्याचे टाळावे, इतरांना गृहित धरु नये-स्पष्ट विचारुन, संवाद साधावा. तसेच  नियमित व्यायाम किंवा प्राणायाम करावा, माइंडफूलनेस, रिलॅक्सेशन, प्रसंगी मानसोपरची मदत घेणे, आपण नेहमी रागीट, चिंताग्रस्त, उदासीन असतो, त्यातून स्वतःला अपराधी समजतो, स्वतःला दोष देतो. हे आपल्या स्वभाविक प्रवृत्तीतून येत असते. या भावना असह्य भावना प्रकारात मोडतात. यासाठी त्यांनी भावना अपार्टमेंट मॉडेल स्पष्ट केले. वरील भावना म्हणजे सहावा मजला तेथे व्यक्ती बुलेट ट्रेनच्या वेगाने लिफ्टने सहज पोहचते. खाली उतरतामना मात्र पायी उतरावे लागते. भावना अपार्टमेंटच्या तिसर्याम मजल्यावर सहनहोतील अशा भावना असतात.

Advertisement

तेथे इतरांचा विचार, चिडचिड, पश्चताप इ. आणि पहिला मजला सहनशीलता, धैर्य, तर तळमजाल्यावर आत्मविश्वास, समाधान, आनंद अशा प्रकारच्या भावना असतात. बेसमेंटमध्ये मात्र पुन्हा समस्या वाढवणार्याह भावना असतात. अशा प्रकारे व्यक्तिने आपला प्रवास सहाव्या मजल्यावरुन तिसर्यात मजल्यावर नंतर पहिल्या आणि तळमजल्याच्या दिशेने करावा. आदिम पाशवी प्रवत्तीकडून मानवी प्रवृत्तीकडे हा प्रवास व्हावा व विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे व्यसनाने कोणतीही समस्या सुटत नाही, असे आवाहान त्यांनी केले. 

या कार्यक्रमादरम्यान सक्षम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष कल्याणी नागोरे यांनी मुलीनी आत्याचाराच्या घटनांनी घाबरुन जाऊ नये, उलट त्यानां धैर्याने सामोरे जाण्याचे आव्हान केले. उपप्राचार्य डॉ विष्णु पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनात वाचनाचे महत्त्व सांगितले. मानवी जीवन आणि भाषासाहित्य समजून घेतांना मानसशास्राचा उपयोग कसा होतो हे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी विद्यार्थ्यांना आव्हाने-ताण कसा नगण्य आहे, हे समजावले आणि अभ्यासावर लक्ष देण्यासाठी प्रेरित केले. आयुष्यात ताण येतो परंतु त्याचे सहज व्यवस्थापन करता येतो, हेही त्यांनी अत्यंत सोप्या आणि मार्मिक शब्दात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page