शिक्षक दिनामित्त आरोग्य विद्यापीठात ’बिइंग ए टिचर’ विषयावर व्याख्यान संपन्न
शिक्षक हा राष्ट्र विकासातील महत्वाचा स्तंभ – कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर
नाशिक : शिक्षक हा राष्ट्र विकासातील महत्वाचा स्तंभ असल्याचे प्रतिपादन कुलगुरु लेफ्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त ’बिइंग ए टिचर’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्र-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू आदी अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, समाज व राष्ट्रविकासाची जडण-घडण करणारे स्तंभ शिक्षक असतात. शिक्षक हा समाज व राष्ट्राचा निर्माता मानला जातो. समाजाचे भविष्य शिक्षकांच्या हाती असते. ते विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरतात. शिक्षक जितके प्रेरक आणि उत्तम दर्जाची ज्ञानाचे स्त्रोत उपलब्ध करून देतील तितका परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो. कोणत्याही विषयाचे परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय अध्यापन शक्य नाही यासाठी कामावर निष्ठा असणे गरजेचे आहे. कामात शिस्त आणि शिक्षणात जिद्द महत्वपूर्ण असून त्याचा समतोल साधणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, शैक्षणिक प्रवासात जिज्ञासा आणि सैन्यदलात राष्ट्राचे रक्षण लक्ष्य ठेऊन मी काम केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती अधिक उत्तम राहण्यासाठी आणि समाज समृद्ध करण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. समाज किती समृद्ध आहे, त्यावर राष्ट्र प्रगतीच्या दिशेने पाऊले टाकते असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे समन्वयन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केेले.या व्याख्यानास महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, अॅकेडमिक विंग, दृष्टी, दिशा, आयुष, फार्मास्युटिकल मेडिसिन, वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षक प्रशिक्षण संस्था, विद्यापीठ संशोधन कक्षातील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते तसेच राज्यातील सलंग्नित वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक दुरस्थ पध्दतीने मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाकरीतादिप्तेश केदारे, रोहित भोये,पुष्कर तऱ्हाळ ,नाना परभणे यांनी परिश्रम घेतले.