यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
रोजगाराची सुवर्णसंधी : 20 कंपन्यांमध्ये 2,150 जागा उपलब्ध
नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवाशक्ती फाऊंडेशन (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेळावा विद्यापीठ मुख्यालयातील कृषी विज्ञान केंद्र, नाशिक येथे पार पडणार आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनाखाली होत असलेल्या या मेळाव्यात महाराष्ट्रातील 20 पेक्षा अधिक नामांकित व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 2,150 हून अधिक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

पात्र उमेदवार
या मेळाव्यात खालील शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार मोफत सहभागी होऊ शकतात –
- 18 ते 35 वर्ष वयोगट
- सर्व शाखांतील पदवीधर
- आय.टी.आय. (सर्व ट्रेड्स)
- डिप्लोमा
- इंजिनिअरिंग (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)
- CNC ऑपरेटर
- CIPET (सीपेट) पूर्ण केलेले उमेदवार
- 10वी/12वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी
अधिक माहितीसाठी संपर्क
उमेदवारांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
98225 44094, 99223 79319, 86985 04752, 90214 22479
विद्यापीठ प्रशासन आणि युवाशक्ती फाऊंडेशनने पात्र उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
