श्री बंकटस्वामी महाविद्यालयात अरविंदांच्या समग्र शिक्षण पद्धतीवर परिचर्चा संपन्न
अरविंदांच्या समग्र शिक्षण पद्धतीतून समग्र क्षमतेचा विद्यार्थी घडेल- श्वेतपद्मा
बीड : अरविंद आश्रम पॉडिचेरी आणि आंतरराष्ट्रीय शहर ऑरोविल यांच्यावतीने अरविंद यांच्या समग्र शिक्षण पद्धतीवर श्री बंकटस्वामी महाविद्यालयात परिचर्चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे यांनी केले.
भारतीय शिक्षण पद्धती त्यामध्ये झालेले संशोधन व महापुरुषांनी केलेले कार्य आज आपण अनेक संशोधन पाहत आहोत की आपल्या भारतीय साहित्यामध्ये मध्ये व प्राचीन ग्रंथामध्ये त्या संशोधनाचे उल्लेख आढळून येतात परंतु पाश्चात्य संस्कृतीने आपल्याकडील संशोधने हे अभ्यासून त्यावर संशोधन करून आपल्या नावावर प्रयोग केल्याचे दिसून येते. परंतु भारतीय संस्कृती अति प्राचीन शिक्षण पद्धती अत्यंत उत्कृष्ट होती आणि याच शिक्षण पद्धतीचा पुन्हा मानवी कल्याणासाठी उपयोग व्हावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमांमध्ये भुवनेश्वर ओरिसा येथून आलेल्या श्वेतपद्मा,जगदीश आणि देव्रत या तज्ञ चमूने विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला अरविंद यांचे भारतीय शिक्षण पद्धती व विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा समग्र शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.भारतामध्ये शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सक्षम नागरिक कसा घडेल यावर त्यांनी अरविंद यांचे विचार प्रकट केले. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय व संस्कृती मंत्रालय यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला.
श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ विवेक मिरगणे उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे, बी जी काळे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रकाश कोंका यांनी केले. आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ मनोजकुमार नवसे यांनी मानले.