शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात कॉण्टेंपोररी नृत्य कार्यशाळा उत्साहात संपन्न
कोल्हापूर : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने दिनांक 20, 21 व 22 ऑगस्ट रोजी कॉण्टेंपोररी नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेसाठी ‘शोवन दास’ (बांग्लादेश) यांचे मार्गदर्शन लाभले.
तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत वेगवेगळ्या पद्धतीचे फिजिकल व मेंटल फिटनेसच्या दृष्टीकोनातून विविध गेम्स, प्रॅक्टिस पद्धतींद्वारे बॉडी अवेयरनेस, फिजिकल अँड मेंटल बॉडी , कॉण्टेंपोररी डान्स फ्रेजेस, ब्लॉकींग, बेसिक ब्यालेट डान्स प्रॅक्टिस, क्रियेटिंग मूव्हमेंट, फ्लोअर वर्क, मेडिटेशन इन डांस इत्यादि विषयांची विद्यार्थ्यांना खूप चांगल्यातर्हेने ओळख झाली. ही कार्यशाळा नृत्य व नाटकासाठीही उपयुक्त ठरली. शेवटच्या दिवशी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांच्या नृत्याने कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये नाट्य व नृत्यातील अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या दिवशी सरस्वती पूजनाने या कार्यशाळेला सुरवात झाली. कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्घाटन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्र विभागप्रमुख डॉ विनोद ठाकुरदेसाई यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत जेष्ठ रंगकर्मी डॉ संजय तोडकर यांनी केले. या कार्यशाळेसाठी डॉ सचिन कचोटे, प्रशांत देसाई आदि मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.