श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न
बीड : वाणिज्य विभागाच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पराग माने व शिरीष जोशी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले की विद्यार्थ्यांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण दरवर्षी वेगवेगळ्या मान्यवरांना आमंत्रित करत असतो आणि त्यांचे मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून आपण कायम प्रयत्न करत असतो, आजपर्यंत याचा फायदा महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना झालेला आहे. विविध कंपन्यांमध्ये डायरेक्ट नोकरीची संधी आपल्या महाविद्यालयातूनच उपलब्ध झाल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक पराग माने यांनी बारावी व पदवीनंतर पुढे कोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत याविषयी मार्गदर्शन केले. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात उच्च पदावर नोकरी कसे मिळेल याची चिंता सर्व विद्यार्थी आणि पालकांना असते आज आपली भारतीय अर्थव्यवस्था महासत्तेकडे वेगाने वाटचाल करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण आरोग्य सेवा, उत्पादन ,बँकिंग ग्राहक सेवा, व्यवस्थापन क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्या कोणत्या मोठ्या संधी उपलब्ध होतील आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा कसा लाभ घेता येईल याविषयी त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीपकुमार उनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ जयद्रथ मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा नितीन चव्हाण यांनी मांडले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.