एमजीएम विद्यापीठात तणावमुक्त जीवनाचा मंत्र विषयावरील व्याख्यान संपन्न

मानसिक स्वास्थ्यासाठी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र अंगिकारणे आवश्यक मानसोपचार तज्ञ डॉ अंजली जोशी

छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक प्रकारचे ताण तणावाला सामोरे जात असतो. या तणावांशी योग्य पद्धतीने सामना करता आल्यास आपली कार्यक्षमता वाढू शकते तसेच आयुष्य आनंददायी होऊ शकते. तणावमुक्तीचे दीर्घकालीन परिणाम मिळवण्यासाठी फील बेटर या दृष्टिकोनाऐवजी गेट बेटर हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र (‘रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हियर थेरपी’) आपण अंगीकारणे आवश्यक असून यामध्ये ए, बी, सी, डी, ई या मॉडेलचा समावेश असल्याचे प्रतिपादन प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ अंजली जोशी यांनी यावेळी केले.

अक्षरांगण, एमजीएम क्लोवरडेल स्कूल आणि इन्स्टिटयूट ऑफ फिजिओथेरपी, मानसशास्त्र विभाग, एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तणावमुक्त जीवनाचा मंत्र’ या विषयावर प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ अंजली जोशी यांच्या व्याख्यानाचे श्रावस्ती हॉल, एमजीएम क्लोवरडेल स्कूल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, डॉ जोशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Advertisement

या व्याख्यानास एमजीएम स्कूलच्या संचालिका डॉ अपर्णा कक्कड, डॉ अस्मिता सूर्यवंशी, डॉ क्षितिजा गाडेकर, डॉ रेखा शेळके, प्रेरणा दळवी, डॉ आनंद निकाळजे, डॉ नीना निकाळजे, प्रा शिव कदम, सुबोध जाधव व सर्व संबंधित उपस्थित होते.  

पुढे बोलताना डॉ जोशी म्हणाल्या, मानसिक स्वास्थ्यासाठी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र (‘रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हियर थेरपी’) आपण अंगीकारणे आवश्यक असून यामध्ये ए, बी, सी, डी, ई या मॉडेलचा समावेश आहे.

A: घटनेची सुरुवात (Activating Event)

B: आपली श्रद्धा पद्धती (Belief System)

C: भावना व त्यांचे परिणाम (Consequences – Emotions)

D: अवास्तव विश्वासांचा प्रतिवाद करणे (Disputing Irrational Beliefs)

E: नवीन आणि प्रभावी विश्वास निर्माण करणे (Effective New Beliefs)

आपल्या जीवनात आपण घटनांमुळे अस्वस्थ होत नअसून त्या घटनांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनामुळे आपले वर्तन प्रभावित होते. त्यामुळे वैयक्तिक दृष्टिकोनावर काम करणे गरजेचे आहे. अतार्किक विचार करण्यापेक्षा तर्कसंगत विचारसरणीला आपल्या वर्तनात आणणे आवश्यक असल्याचे डॉ जोशी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page