नागपूर विद्यापीठात स्व-संरक्षण शिबिरात विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे
पदव्युत्तर शारीरिक शिक्षण व विज्ञान संस्थेचे आयोजन
नागपूर : विद्यार्थिनींकरिता स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर शनिवार, दिनांक ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग, शासकीय विज्ञान संस्था आणि महिला विकास सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात विद्यार्थिनींना आत्मरक्षणाचे धडे देण्यात आले.
शासकीय विज्ञान संस्थेमध्ये आयोजित स्वसंरक्षण शिबिरात ब्लॅक बेल्ट टेन ४ कराटे असोसिएशनचे अध्यक्ष विजय गिजरे व त्यांच्या चमूने विद्यार्थिनींना आत्म संरक्षणाबाबत माहिती दिली. प्रात्यक्षिकांद्वारे विविध उदाहरणांद्वारे आत्मसंरक्षणाचे कौशल्य शिकविले. यावेळेस शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ जयराम खोब्रागडे, विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ माधवी मार्डीकर, डॉ नक्की सिद्धीकी, डॉ सीमा कुरळकर, डॉ अरुणा कावडकर, डॉ सुनील कापगते, वृषाली देशमुख, रोशनी खोब्रागडे, निकिता वैष्णव, शुभम सैनिक, जस्सी सिंग यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले.