देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जागतिक स्वैच्छिक रक्तदान दिन संपन्न

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थानशास्त्र महाविद्यालयात जागतिक स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 350 प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेऊन रक्तदान केले. महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ एस व्ही लहाने यांच्या हस्ते फित कापुन शिबिराचे उदघाटन करण्यात आले. रक्त संकलन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील लायन्स ब्लड बॅकचे श्याम सोनवणे, सत्यसाई ब्लड बॅकचे महेंद्रसिंग चव्हाण व संजीवनी ब्लड बॅकचे डॉ महेश गर्जे याचा सहभाग होता.

World Voluntary Blood Donation Day celebrated at Devagiri College of Engineering and Management
रक्तदान शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने व सर्व विभागप्रमुख.

रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकते, रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असुन सर्व प्राध्यापक व विदयार्थ्यांनी रक्तदान करुन मानवधर्माचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच विविध आजार व अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने रक्तांची आवश्यकता भासते तरी सर्वांनी या सामाजिक कार्यात स्वयप्रेरणेने सहभाग घ्यावा असे प्रतिपादन केले.

Advertisement

शिबिरात रक्तदान केलेलल्या रक्तदात्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाशदादा सोळुंके, सचिव आ सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष लहाने, ट्रेनिंग ॲण्ड प्लेंसमेंटचे डिन प्रा संजय कल्याणकर, विभागप्रमुख डॉ सत्यवान धोंडगे, डॉ गजेंद्र गंधे, डॉ सचिन बोरसे, डॉ आरती वाढेकर, डॉ सुगंधा नांदेडकर, डॉ शोएब शेख, डॉ रुपेश रेब्बा, प्रा अमरसिंह माळी, अच्युत भोसले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. शिबिराच्या आयोजनासाठी डॉ सचिन अग्रवाल, डॉ ऋषिकेश पाखले, प्रा जावेद शेख, प्रा विवेक बल्लाळ, प्रा कृष्णा मर्द्रेवार, प्रा भारत पवार, प्रा तुषार उकिर्डे, प्रा विशालसिंग चौहान व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page