शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह निमित्त पथ नाटय

कोल्हापूर :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांमध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या सामाजिक कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले.  ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ला यंदा तीन वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने २४ ते २९ जुलै दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठात या निमित्ताने पोस्टर, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, रिल्स स्पर्धांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आज विद्यापीठात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’विषयी जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या धोरणाच्या विविध पैलूंवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.

Advertisement
Street Play on the occasion of National Education Policy Week at Shivaji University

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रिया देशमुख,  उपकुलसचिव गजानन पळसे, डॉ. उत्तम सकट, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ.नितीन माळी, एमएसडब्ल्यू विभागाचे समन्वयक डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. उमेश गडेकर, डॉ. गजानन साळुंखे, चेतन गळगे, डॉ.तानाजी घागरे, मृणालिनी जगताप, डॉ. प्रताप खोत उपस्थित होते. ओमकार संकपाळ, गायत्री चव्हाण, कोमल गरड, वासवी पोतदार, सायली शहापूरकर, शिवानी माने, विद्या करचले, शुभांगी भोसले या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. यासाठी डॉ. उर्मिला दशवंत आणि डॉ. मुनीर मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page