“डॉबाआंम” विद्यापीठाच्या ’डीडीयुकेके’ व परम स्किल ट्रेनिंग इंडिया यांच्यात सामंजस्य करार
अध्यापन, कौशल्यासाठी सामंजस्य करार
’डीडीयुकेके-परम’ यांच्यात अदान-प्रदान होणार
छत्रपती संभाजीनगर : ’बॅचरल ऑफ व्होकेशन’च्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील कौशल्ये व ज्ञानाचे उपयोजन उत्तमरितीने करता यावे, यासाठी ’दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र’ व परम स्किल ट्रेनिंग इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ’डीडीयुकेके’ या संस्थेच्या पुढाकाराने हा करार करण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात या संदर्भात उभय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, केंद्र संचालक डॉ भारती गवळी, अॅड अमोल सांबरे आदींची उपस्थिती होती.
तर ’परम’चे स्किल डायरेक्टर परमेश्वर राजबिंडे, कोऑपरेशन डायरेक्टर योगेश बंगाळे यांची उपस्थिती होती तसेच केंद्राचे डॉ कुणाल दत्ता, प्रा विशाल उशिर, प्रा गंगाधर बंदेवाड, रत्नदीप हिवराळे, सचिन रायलवार, राहुल नारनवरे हेही यावेळी उपस्थित होते. या करारांतर्गत दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्रात ’बी व्होक’ शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कंपनीत प्रशिक्षण, कौशल्ये याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ’हॅडस ऑन ट्रेंनिंग’ देण्यात येईल.
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी सहा महिन्यापुर्वी उद्योजकांसमवेत बैठक घेऊन विद्यापीठ-उद्योजक क्षेत्रात सुसंवाद सुरु केला. या अनुषंगाने या दोन संस्थामधील करार शिक्षण-उद्योग क्षेत्रात ’इको सिस्टीम’ सुरु करण्यास कारणीभूत ठरेल. असे प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे म्हणाले. तसेच व्यावसाभिमुख कौशल्ये व ज्ञानाचे उपयोजन यासाठी हा करार फलदायी ठरेल, असे परमेश्वर राजबिंडे म्हणाले.