राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
आरोग्य हीच संपत्ती – प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे
नागपूर : आरोग्य हीच संपत्ती असून तिला जोपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे यांनी केले. सामान्य आरोग्य तपासणी, दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी, नाक- कान- घसा तपासणी, फिजिओथेरपी, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रवी नगर येथील डी लक्ष्मीनारायण परिसरातील आरोग्य केंद्रात पार पडलेल्या शिबिराचे उद्घाटन करताना डॉ दुधे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे होते तर यावेळी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ सरोज शामकुवर यांची उपस्थिती होती. शारीरिक व मानसिक स्थितीवर उत्तम आरोग्य अवलंबून असल्याचे डॉ दुधे पुढे बोलताना म्हणाले. आपण कार्याने कितीही मोठे असलो आणि आरोग्य कमकुवत असेल तर यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे उत्तम आरोग्य जोपासण्याचे आवाहन डॉ दुधे यांनी केले. यावेळी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ सरोज शामकुमार यांनी प्रास्ताविक करताना पूर्वी आपण आरोग्य शिबिराकरिता एक-एक तज्ञांना बोलावीत होतो. या शिबिराकरिता सर्व तज्ञांना एकत्रित बोलाविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये दंत चिकित्सक डॉ. पल्लवी भगत, कान नाक-घसा-तज्ञ डॉ. आरुषी बक्षी, डॉ. प्रतीक्षा जपझापे, पॅथॉलॉजिस्ट डॉ. सागर गवई, समाजसेवक डॉ. संदीप महाकाळकर, फिजीओथेरपीस्ट डॉ. प्रेरणा काळे, डॉ. मानसी अग्रवाल, डॉ. विभूती गौर, डॉ. शिवानी बेलखोडे, न्यूरो फिजिओथेरपी डॉ. पुष्पा धोटे, डॉ. शलाका धनकर, दंत चिकित्सक डॉ. ललित गहाणे, नेत्रतज्ञ डॉ. पराग ठाकरे आदी डॉक्टरांच्या चमूने आरोग्य शिबिरास सहकार्य केले. आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता विद्यापीठ आरोग्य केंद्रातील मनीष ठाकरे, प्रकाश भुशीकर, प्रकाश वानखेडे, निलेश कनेर, शैलेश इरपाची यांनी परिश्रम घेतले.