वसतिगृह समितीच्या निर्णयाप्रमाणे प्रवेशप्रक्रियेची अंमलबजावणी

प्र-कलगुरूंच्या अध्यक्षतेखालील समितीने ठरवली नियमावली

वसतिगृहात प्रवेशासाठी ओळखपत्र बंधनकारक

प्रवेशित विद्यार्थ्यांना देणार खोलीचा ताबा

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृह विकास समितीच्या नियमावलीनुसार प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. वसतिगृह क्रमांक एकमधील अनधिकृत व्यक्ती राहत असलेल्या खोल्या आजपर्यंत चार वेळा नोटीस दिल्यानंतरच खाली करून घेण्यात येत आहेत, अशी माहिती वसतिगृह चीफ रेक्टर यांनी दिली.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी व्यवस्थापन परिषदेने प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखालील वसतिगृह विकास समिती (Hostel Development Committee) गठीत केली आहे. या समितीने वसतिगृह प्रवेश नियमावली ठरविली असून त्याप्रमाणे ही संपूर्ण प्रक्रिया सुरु आहे.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज वस्तीगृह क्रमांक एक या ठिकाणी एकूण शंभर खोल्या असून दोनशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. यासाठी एकूण ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत दोन प्रवेश याद्या घोषित झाल्या असून १३० विद्यार्थ्यांना लेखा विभागात शुल्क भरून प्रवेश देण्यात आला. अजूनही ७० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बाकी आहे, तथापि जवळपास ३५ खोल्यांमध्ये अनधिकृत व्यक्ती राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये काही विद्यापीठाबाहेरील संशोधन केंद्रात संशोधन करणारे तसेच जे विद्यापीठात शिक्षण घेत नाहीत असेही व्यक्ती या ठिकाणी आढळून आले.

यापैकी १ ते २५ या खोली क्रमांक मधील नऊ खोल्या खाली करून घेण्यात आल्या आहेत. याचे व्हिडिओ चित्रीकारण करून खोल्या रिकाम्या करण्यात आल्या व सर्व सामान एक खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. उन्हाळ्यापासूनच या विद्यार्थ्यांना दुरुस्तीच्या कामासाठी खोल्या रिकाम्या करून देण्यासंदर्भात म्हणून चार वेळा नोटीस देण्यात आली. तसेच तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देऊनही खोलीला कुलूप लावून ते निघून जात असत व रात्री उशिरा येऊन गुपचुप खोलीत जात असत. सुरक्षारक्षकांनी ओळखपत्राची मागणी केली असता त्यांच्याशी वाद विवाद केल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यर्थी यांची सुरक्षा लक्षात घेऊन वसतिगृहाचे ओळखपत्र तपासूनच प्रवेश देण्यात येणार आहेत, असेही वसतिगृह चीफ रेक्टर डॉ सतीश दांडगे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page