डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची श्री गणेश उत्सवात सामाजिक बांधिलकी

साऊंड सिस्टीमबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा आवाजाच्या तीव्रतेचा त्रास होऊ नये यासाठी डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकी दरम्यान कापसाच्या बोळ्यांचे वाटप करत लोकांचे प्रबोधन केले. गेल्या १४ वर्षांपासून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

Social Commitment of DY Patil Engineering Students in Shree Ganesh Utsav
साउंड सिस्टीमचा आवाजाबाबत जनजागृती करताना डी वाय पाटील अभियांत्रिकीचे एन एस एस विद्यार्थी व प्राध्यापक.

विसर्जन मिरवणूक म्हटले की मोठ्या आवाजाची गाणी, हृदयात धडकी भरवणारी साऊंड सिस्टीम असे चित्र तयार झाले आहे. आबालवृद्धांना आवाजाचा त्रास होऊ नये व विसर्जन मिरवणुकीचाही आनंद घेता यावा यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोफत कापसाचे बोळे वाटत सामाजिक बांधिलकीची जाणीव घट्ट केली.

Advertisement

संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे उपक्रमासाठी प्रोत्साहन, तर कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ लितेश मालदे यांचे सहकार्य मिळाले.

अधिष्ठाता डॉ राहुल पाटील, एन एस एस प्रकल्प अधिकारी योगेश चौगुले, प्रा नीलिमा वटकर यांच्यासमवेत अथर्व माने, तनिषा मधाने, स्वप्निल माने, वैष्णवी पंजाल, अथर्व गगाने, प्रज्ञेश जामदार, सार्थक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page