पंडित जवाहलाल नेहरू महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. प्रकाश काळे (दादासाहेब), ( सचिव, अजिंठा शिक्षण संस्था ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून हैदराबाद / मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी हरिश्चंद्र लघाणे (बापु), (मा जिल्हा परिषद अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर), सतीशचंद्र काबरा डॉ राजाराम जेवे, प्राचार्य डॉ संजय मून, उपप्राचार्य डॉ एस आर मंझा , डॉ एम आर खान, (कार्यालयीन अधीक्षक) व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर इतिहास विभागाच्या वतीने हैदराबाद मुक्ती संग्राम दिन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून प्रकाश काळे ( दादासाहेब) सचिव, अजिंठा शिक्षण संस्था हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिश्चंद्र ल घाणे (बापू ) हे उपस्थित होते. तसेच या व्याख्यानाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सतीशचंद्र काबरा व सहायक प्रा डॉ राजाराम जेवे (देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा सर्जेराव बनसोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा गोविंद फड यांनी मानले, याप्रसंगी उपप्राचार्य डॉ एस आर मंझा, महाविद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.