राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘रश्मीरथी’ नाटकाची प्रस्तुती आज
एक दिवसीय राष्ट्रीय नाट्य उत्सव अंतर्गत आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘सुरभी’ बेगुसराय बिहार निर्मित राष्ट्रकवी रामधारी सिंह ‘दिनकर’ रचित ‘रश्मीरथी’ या एकल प्रस्तुती नाटकाचे आयोजन बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता करण्यात आले आहे. कॅम्पस चौक ते अंबाझरी टी पॉइंट मार्गावरील विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या नाटकाचे आयोजन एक दिवसीय राष्ट्रीय नाट्य उत्सव अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ललित कला विभाग व छंद मंदिर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अभिनेता- निर्देशक म्हणून हरीश हरिऔध (एनएसडी) व प्राक्कथन जयंत गाडेकर (एनएसडी) यांचे राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ललित कला विभाग व छंद मंदिर विभाग प्रमुख डॉ संयुक्ता थोरात यांनी केले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी केले आहे.