मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न
घोडेगाव : राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सद्रगुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ०७:०० वाजता विद्यार्थ्यांची प्रभातफेरी घोडेगावात निघाली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव साहेब, मुख्य अतिथी म्हणून तेजराव गाडेकर साहेब (निवृत्त प्र शिक्षणाधिकारी संभाजीनगर), प्रियंका भिसे मॅडम ( RFO सामाजिक वनीकरण विभाग खुलताबाद), तागड साहेब, प्रा बागले सर, विद्या मोहिते मॅडम, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रकाश पा जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब पा जाधव, पोलीस पाटील घोडेगाव कारभारी पा जाधव, दिलीप जाधव, ग्रंथालयाचे ग्रंथपाल द्वारकादास पा जाधव, गणेश पा जाधव सुरेश गोरे, प्रविण पा जाधव हे उपस्थित होते.
सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय येथे प्रा बागले सर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. तर वरीष्ठ महाविद्यालय येथे तेजराव गाडेकर साहेब यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव साहेब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर प्रियंका भिसे मॅडम यांचे भाषण झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना खुप सुंदर असे मार्गदर्शन केले. एक पेड मां के नाम ही संकल्पनेनुसार सर्वांनी झाडे लावावीत असे सांगितले. यानंतर तेजराव गाडेकर साहेब यांचे भाषण झाले. यांनी विद्यार्थ्यांना Communication skill, Personality Development याबद्दल सांगितले. विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त खुप सुंदर गीत म्हटले व काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूर मॅडम यांनी केले. तर आभार प्रशासकीय अधिकारी गोमलाडु सरांनी मानले. तसेच मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने गावकरी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यास, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.