डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण, व्याख्यान
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी दि १७ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त मुख्य प्रशासकीय इमारती समोरील हिरवळीवर कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते सकाळी ८ः३० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर लगेचच महात्मा फुले सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे विस्वस्त डॉ शिरीष खेडगीकर यांचे व्याख्यान होणार आहे. कुलगुरु डॉ विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहतील. डॉ खेडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कुटूंबातील असून शासकीय दंत महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामदिन अमृत महोत्सव समितीचे ते सदस्य आहेत. यावेळी ते ’मराठवाडा मुक्तीसंग्राम’ या विषावर व्याख्यान देणार आहेत.
कार्यक्रमास प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक डॉ कैलास अंभुरे व डॉ कैलास पाथ्रीकर यांनी केले आहे.