डॉ पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे मणक्याच्या हाडाची कार्यशाळा संपन्न
अमरावती : डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, अमरावती अस्थिरोग संघटना व बॉम्बे स्पाईन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने पाठीच्या मणक्याच्या हाडाच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत व अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ गणेश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आले होते. यावेळी अमरावती अस्थिरोग संघटनेचे विद्यमान अध्यक्ष डॉ खालीद जमील, सचिव डॉ राजेश उभाड, सहसचिव डॉ भुषण सगणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बॉम्बे स्पाईन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष डॉ गौतम झवेरी यांच्या चमुने कार्यशाळेतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ अर्गेकर, डॉ टिकू व डॉ शाह यांचा समावेश होता. पीडीएमएमसी येथील अस्थिरोग विभागाचे युनिट इनचार्ज डॉ राजेंद्र बैतुले व डॉ ऋषीकेश सावदेकर यांचेही मार्गदर्शन कार्यशाळेसाठी लाभले. बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ विजया पाटील, डॉ माहुरे, डॉ चौधरी, डॉ चव्हान व चमुचे अमुल्य योगदान लाभले. यावेळी अमरावती जिल्ह्यातील विविध अस्थिरोगतज्ञ उपस्थित होते. डॉ नितीन जयस्वाल, डॉ भास्कर बुटे व डॉ संग्राम देशमुख यांनी कार्यशाळेचे नियोजन प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख, संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालय प्रशासनाचे नेहमीच अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करण्याकरीता सहकार्य व मार्गदर्शन लाभते. अस्थिरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व अस्थिरोग तज्ञांना नवनवीन आधुनिक शैलीचे ज्ञान कार्यशाळांमुळे मिळत असते.