मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी एड (सेवांतर्गत ) व बी एड (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दिनांक 16/09/2024 ते दिनांक 30/09/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विद्यार्थी सदर कालावधीत विनाविलंभ शुल्क भरून प्रवेश घेऊ शकता. अशी माहीती विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ प्रकाश देशमुख यांनी दिली.
विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहिती पुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर (स 10:30 ते सायं 05:30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्या वगळून) खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
• विद्यापीठाचे हेल्पलाईन नं- (0253)-2230580, 2230106, 2231714, 2231715
• मोबाईल नं – 9307579874, 9307567182, 9272046725
विद्यार्थ्यींची गैरसोय टाळण्यासाठी सदर मुदतवाढ करण्यात आलेली आहे, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वरील मुदतीत प्रवेश घ्यावा असे आवाहन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.