सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नोकरी
१५ पैकी ११ प्रस्तावास मंजुरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या हस्ते शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार गट- क व गट- ड मध्ये नियुक्ती देण्याबाबत विद्यापीठाने सादर केलेल्या १५ पैकी ११ प्रस्तावांना उच्च शिक्षण संचालनालयाने मान्यता दिली आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या मान्यतेनंतर ११ उमेदवारांना विद्यापीठात रुजु करून घेण्याची कार्यवाही करण्यात आली. सेवेत रुजू करून घेताना संबंधित उमेदवाराकडे जातवैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे ११ उमेदवारांपैकी १ उमेदवार शिवानी सुरज कहाते यांचेकडे जातवैधता प्रमाणपत्र असल्याने त्यांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या हस्ते निम्न श्रेणी लिपीक पदावरील नियुक्ती पत्र देऊन भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कुलगुरू कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजू हिवसे, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ संजय कविश्वर, आस्थापना विभागातील सर्वश्री राकेश कोपुलवार, आनंद मेश्राम, संदिप थापा, स्वप्निल मोडक आणि लाड-पागे संघटनेचे पदाधिकारी सतिश सिरसवान, बंटी तुर्केल आदी उपस्थित होते.