सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाची यशस्वी वाटचाल
सर्वे भवन्तू सुखिन: सर्वे सन्तु निरामया l
सर्वे भद्राणी पश्यन्तु मा काश्ची दुःख भागभवेतll
या वृहदारण्यक उपनिषदा मधील श्लोकास अनुसरून १५ सप्टेंबर १९७४ रोजी खासदार स्व केशर काकु क्षीरसागर यांनी होमिओपॅथिक अँड बायोकेमिक महाविद्यालय अर्थात आजचे सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय, याची मुहूर्त मेढ रोवली व पाहता पाहता गेलीं ५० वर्षात या औषधी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे समजले देखील नाहीं. मात्र या मागे स्व केशर काकु यांचे मोलाचे योगदान, मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मार्गदर्शन व नेतृत्व तर प्राचार्य डॉ अरुण भस्मे यांची ४९ वर्षाची तपश्चर्या आहे.सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय, प्राचार्य डॉ व्ही एम गुजराथी, खासदार स्व केशर काकु क्षीरसागर, मंत्री जयदत्त क्षीरसागर, प्राचार्य डॉ अरुण भस्मे, श्रीकृष्ण बाखडे गुरुजी, बीड, सुवर्ण महोत्सव, आपला कट्टा,
१९७४ ते ७६ पर्यंत महाविद्यालयाचा प्रशासकीय तसेच प्राचार्याचा कार्यभार त्या वेळचे प्राचार्य डॉ व्ही एम गुजराथी यांनी सांभाळला. त्यावेळी महाविद्यालय हे कोर्ट ऑफ होमिओपॅथिक अँड बायोकेमिक सिस्टिम्स ऑफ मेडिशिंन, मुंबई शी सलांग्नित होते. तत्कालीन खासदार केशर काकू ह्या विदर्भाच्या दौऱ्यावर असताना अमरावती जिल्हा तेली समाजाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बाखडे गुरुजींना बीड येथे सुरू केलेल्या होमिओपॅथिक महाविद्यालयात प्रा म्हणून काम करण्यास समाजातील हुशार, तज्ञ व कष्टाळू डॉक्टर्स ची नांवे सुचविण्यासाठी सांगितले आपण त्यांचा निश्चीत विचार करू त्यावर अमरावती स्थित बाखडे गुरुजीं यांनी डॉ रुण भस्मे यांची शिफारस केली.
त्यावेळी डॉ अरुण भस्मे हे अमरावती येथील मातृसदन संस्थेचे होमिओपथिक महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डॉ भस्मे यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर अतिशय मेहनतीने महाविद्यालयातील सर्व कामे केले. त्याचे फलित म्हणून काकूंनी डॉ भस्मे यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी १९७६ मध्ये सोपवली. त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून महाविद्यालयास नवा आयाम देण्याचे कार्य तर केलेच पण त्याचबरोबर देशातील होमिओपॅथी क्षेत्रातील विविध उच्च पदांवर यशस्वीरीत्या कार्य करुन दाखविले आहे. जसे की डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ, नाशिक यांचे अधिष्टाता पदासह, विद्यापरिषद, अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विविधं विभागात सदस्य म्हणून तर केंद्रीय होमिओपथिक परिषद नवी दिल्ली चे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे.
तसेच देशातील विविधं विद्यापीठातील मंडळावर कार्य केलेलं आहे. एखाद्या संस्थे मध्ये सलग ४३ वर्ष प्राचार्य म्हणून काम करणारे व पाच वर्ष सलागार म्हणून कार्य करणार व्यक्तीमत्व एकमेव असेल. त्यंनी होमिओपथिक क्षेत्रात अमुल्य काम केल्यामुळे महाराष्ट्र होमिओपथिक परिषद मुंबईने डॉ सॅम्युएल हनिमन जीवन गौरव तर महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ, नाशिक ने Life Time Achievement या पुरस्काराने सन्मानित केले आहे केवळ या त्यांच्या कार्य शैलीमुळेच संस्थेने महाविद्यालयाचा कार्यभार पाहण्यास बंधन विरहीत परवानगी दिल्यामुळे महाविद्यालयाचा लौकिक संपूर्ण देशात दिसून येत आहे.
1974 ते 1993 पर्यंत महाविद्यालयात आमुलाग्र असा बदल होत गेला तेव्हा महाविद्यालय काही महिने सराफा गल्लीत, तर गीता कन्या प्रशालेच्या प्रिमायसेस मध्ये काही वर्ष त्यानंतर नवगण कॉलेज मध्ये काही वर्ष तर जालना रोड वरील इमारतीत अनेक वर्ष काढल्यानंतर संस्थेने तीन एकर जागा घेऊन खऱ्या अर्थाने महाविद्यालयाचा विकास साधला.
1974 साली सुरू झालेल्या महाविद्यालयात डीएचएमएस ते एमडी व आता आता पीएच डी अभ्यासक्रम पूर्ण करून हजारो विद्यार्थ्यांनी होमिओपॅथिक वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्राविण्यांसह पदवी प्राप्त केली. आज संबंध राज्यासह इतर राज्यांतही या महाविद्यालयाचा विद्यार्थी अत्यल्प दरात होमिओपॅथीची आरोग्य सेवा देत महाविद्यालयाचे नांव उज्ज्वल करीत आहे. महाविद्यालयाची स्वतःची भव्य अशी तीन मजली इमारत के एस के महाविद्यालयाच्या बाजूच्याच तीन एकर प्रशस्त जागेमध्ये 1993 मध्ये सर्व सुविधांनी युक्त अशी महात्मा गांधी हॉस्पिटल सह उभी राहिली.या नवीन इमारतीमध्ये महाविद्यालयाचा प्रशासकीय कारभार स्वतंत्र विभागांमध्ये सुरू झाला यामध्ये मेडिसिन, होमिओपॅथिक मटेरिया मेडिका, ऑर्गनन, पेडिया ट्रिक्स, सायकियाट्रिक्स, रेपरटि, मेडिसिन,फार्मसी, हे विभाग स्वतंत्र दालनात विद्यापीठ अधिनियमाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यंत्रसामग्रीसह विकसित करण्यात आली.
प्राचार्य डॉ अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून महाविद्यालयास राज्यात नवी ओळख निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात डीएचएमएस बरोबरच सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी नवी दिल्ली यांनी 1986 ला सोनाजीराव क्षिरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयास बी एच एम एस या पदवी अभ्यासक्रमास मान्यता दिली. मराठवाडा विद्यापीठातून हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचेशी संलग्नित झाले. बी एच एम एस या पदवी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाने सातत्याने उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण देऊन हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविले.
वैद्यकीय शिक्षण देणारे एस के एच बीड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवले. काकूंनी होमिओपॅथीचे महाविद्यालय सुरू केल्या नंतर त्या महाविद्यालयाच्या विकासात्मक प्रगतीच्या दृष्टीने कठोर परिश्रम घेतले अनंत अडचणीवर मात करत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सर्वोत्कृष्ट कसा राहील या दृष्टीने अविरत प्रयत्न केले. महाविद्यालयात चांगल्या प्रकारचे शिक्षण व शैक्षणिक सुविधांसह उच्चशिक्षित तज्ञ प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या बीड सारख्या शहरात मराठवाड्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येऊ लागली 15 सप्टेंबर 1974 ला प्रथम महाविद्यालयात डी एच एम एस हा होमिओपॅथीचा कोर्स मराठवाड्यात सर्वात आधी सुरू करण्यात आले.
1986 मध्ये मराठवाड्यात व महाराष्ट्रात सर्वात आधी बीएचएमएस अभ्यासक्रम सुरू करणारे हे महाविद्यालय आहे याच महाविद्यालयात महाराष्ट्र राज्यात १९९४ ला सर्व प्रथम होमिओपॅथी मध्ये तीन विषयात तर २००१ मध्ये उर्वरित चार विषयात एम डी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. होमिओपॅथीमध्ये देशात सर्वप्रथम पीएचडी अभ्यासक्रम सुरू करणारे सोनाजीराव क्षिरसागर होमिओपॅथिक महाविद्यालय पहिले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाने केंद्र सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या संस्थानला डॉ ईश्वरदास, डॉ एस के तिवारी व डॉ सुभाष सिंग हे संचालक दिले. महाविद्यालयाने केवळ वैद्यकीय शिक्षणातूनच विद्यार्थ्यांना परिपूर्ण केले नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात व व्यावसायिक शिक्षणाबाबत जागृत राहून महाविद्यालय स्तरावरच परिपूर्ण तयारी करून घेतली.
बीड सारख्या भागात वैद्यकीय शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालयात तर होतेच परंतु राज्यातही महाविद्यालय सर्वोत्तम दर्जाचे ठरले. महाविद्यालयात विविध विभागांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात,तसेच आरोग्य जनजागृती शिबिरे राबवून गावगाड्यातील गोरगरीब कष्टकरी यांना आरोग्य शिबिरा अंतर्गत मोफत तपासणी करून औषधोपचार ही करण्यात येत असतात. विद्यापीठाच्या स्पंदन अविष्कार कार्यक्रमात विद्यार्थी भाग घेऊन यशस्वी होत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना या माध्यमातून खेडेगावात निवासी शिबिर आयोजित केली जातात. मतिमंद व गतिमंद रुग्णांसाठी स्व डॉ प्रफुल्ल विजयकर यांच्या संयुक्त विद्यमानाने दर तीन महिन्याला सुरु केलेले विशेष शिबिर आता डॉ अंबरीश विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात आहेत.
रुग्णांची वाढती संख्या पाहता महाविद्यालय संलग्नित महात्मा गांधी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स तसेच कर्मचाऱ्यांचें ही शिबीर यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य लाभत आहे. महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दूर दूरवरून रुग्णांची गर्दी होऊ लागली, अत्यंत कमी दरात असाध्य रोगांवर होमिओपॅथीच्या उपचाराने कायमस्वरूपी बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.स्वामी रामदेव बाबाच्या पतंजली योगपीठाच्या सौजन्याने दररोज सकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात ५ ते ७ या वेळेत योग शिबीर घेतले जाते, या करिता काकू नाना प्रतिष्ठानचे सहकार्य मिळत आहे. पदवी अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाची ही सुविधा याच महाविद्यालयात मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला यामध्ये होमिओपॅथिक मटेरिया मेडिका, ऑर्गनन, रेपर्टरी, मेडिसिन, पीडियाट्रीक्स, फार्मसी, सायक्याट्रि, अभ्यास शिकवला जात आहे. महाविद्यालयात सातत्याने तज्ञ व अनुभवी विषय तज्ञांची मार्गदर्शनपर परिसंवाद तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचेही आयोजन करण्यात येते. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी परिपूर्ण ज्ञान घेऊन च समाजातील कष्टकरी गरीब रुग्णांना कमी दरात दर्जेदार आरोग्य विषयक सेवा सामाजिक बांधिलकी म्हणून देत असतात याचा आजवर हजारो रुग्णांनी लाभ घेतला.
आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव मंत्री जयदत्तजी (अण्णा) क्षीरसागर यांनी महाविद्यालयाच्या विकासात्मक दृष्टीने विशेष प्रयत्न केले तसेच महाविद्यालयात विद्यार्थी अभिमुख कार्यक्रम राबवण्यास सातत्याने चालना दिली. देशात कोविड-19 या साथ रोगांने थैमान घातले होते. या रोगामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गावच्या गावी व शहरे लॉकडाऊन करण्यात आली होती. या परिस्थितीतही महाविद्यालयाने जवळपास पाच लाख लोकांपर्यंत होमिओपॅथीचे संजीवनी ठरलेले आरसेनिक अल्बम हे कोविड-19 वरील प्रभावी असे औषध नगरपालिकेचे नगरसेवक तसेच गावचे सरपंच यांच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी मोफत वितरित करण्यात आले. या औषधाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला.
महाविद्यालयात सर्वच विभागात तज्ञ विभाग प्रमुख तसेच कुशल कर्मचारी असल्याने महाविद्यालय विद्यार्थ्यांना सर्व उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवीत असते महाविद्यालयाचे मध्यवर्ती ग्रंथालयात जवळपास १२६०० ग्रंथसंपदा उपलब्ध असून ज्ञानार्जनासाठी ५० होमिओपॅथी या विषयातील नियतकालिके सबस्क्राईब केलेले आहेत. तसेच ग्रंथालय लायब्ररी मॅनेजमेंट या ग्रंथालय संगणक प्रणाली द्वारे संगणकीकृत झालेले असून ग्रंथालयात ई- ग्रंथाचा मोठा डेटाबेस उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात स्वतंत्र ऑडिओ व्हिडिओ उच्च दर्जाची लॅब उभारलेली असून विद्यार्थ्यांस परिपूर्ण ज्ञान मिळवण्यास या लॅबचा उपयोग होतो आहे.
अशा ह्या राज्यातच नव्हेतर देशपातळीवर अव्वल दर्जाचे म्हणून कसोटीस उतरलेले वैद्यकीय महाविद्यालय याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना संपूर्ण हिंदुस्थानात विखुरलेले विद्यार्थी आज 15 सप्टेंबर रोजी सहभागी होत आहेत यातच या महाविद्यालयाचे खऱ्या अर्थाने यश लपलेले दिसून येते.
आज या महाविद्यालयाने होमिओपॅथीच्या क्षेत्रात उभारलेल्या आरोग्य मंदिरावर सुवर्ण कलशारोहण होत असताना स्व केशर बाई ऊर्फ सर्वांच्या काकू यांची प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय रहात नाही.
म्हणून च या मातेस व महाविद्यालयास शतशः प्रणाम
डॉ महेश गोलेकर