एमजीएमच्या शुटींग रेंजच्या नेमबाज खेळाडूंचे दमदार यश
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे बालेवाडी येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र एअर गन आणि फायर आर्म नेमबाजी स्पर्धेत एमजीएम शुटींग रेंजच्या नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे. यात आर्या महाजन हिने ३४४ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिने युथ वुमेन गटात हे यश मिळविले आहे. याच स्पर्धेत महेंद्र काथार याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने वरिष्ठ पुरुष गटात ३६२ गुण मिळविले.
याशिवाय या स्पर्धेत रोहिणी कातुरे, पयस्विनी सिरसाट यांनी देखील दमदार कामगिरी केली आहे. या सर्व खेळाडूंची वेस्ट झोन व जी व्ही मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, क्रीडा संचालक नितीन घोरपडे आणि प्रशिक्षण गीता म्हस्के यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे सर्व खेळाडू एमजीएम शूटिंग अकॅडमी येथे नेमबाज व प्रशिक्षक गीता म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.