यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे गोवर्धन गावाशी अतुट नाते

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गणेश मंडळातर्फे आयोजित मानाची श्रीगणेश महाआरती गोवर्धन गावाचे सरपंच गोविंद डंबाळे व उपसरपंच बाळासाहेब लांबे यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांची प्रमुख उपस्थिती होती.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University has an unbreakable relationship with Govardhan village
Yashwantrao Chavan Maharashtra Open University has an unbreakable relationship with Govardhan village

यावेळी प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना गोवर्धन गावाचे सरपंच गोविंद डंबाळे व उपसरपंच बाळासाहेब लांबे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व गोवर्धन गाव, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांचे अतुट असे नाते असल्याचे सांगितले. त्यामुळे गोवर्धन ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडून विद्यापीठास पूर्वीप्रमाणे सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच श्रीगणेश महाआरतीचा मान दिल्याबद्दल दोघांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले.

Advertisement

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी विद्यापीठ इमारत व परिसर हा गोवर्धन गाव – ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले. या गावाचे विद्यमान सरपंच गोविंद डंबाळे व उपसरपंच बाळासाहेब लांबे यांच्यासह आजी माजी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे विद्यापीठास स्थापनेपासून आजतागायत अनमोल असे सहकार्य लाभात आल्याचे सांगत त्यांच्या प्रती विद्यापीठाकडून आभार व्यक्त केले.

विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड व वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे हस्ते प्रमुख अतिथि यांचा विद्यापीठाच्या वतीने शाल, श्रीफळ, आंब्याचे रोप व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कर्मचारी गणेश मंडळाच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापन मंडळ सदस्या प्रा डॉ संजीवनी महाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, यांच्यासह विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलसचिव दिलीप भरड यांनी आभार मानले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी प्रमुख अतिथि यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page