डेक्कन कॉलेज, पुणे येथे भाषाप्रेमींसाठी बहुभाषिकतेवर पाच दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
पुणे : महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था व डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या सहकार्याने, ९ ते १३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ‘बहुभाषिकता’ या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भाषाप्रेमी, संशोधक आणि शिक्षकांना आकर्षित केले. भारतातील भाषिक विविधतेचे सखोल अन्वेषण आणि विविध भाषिक तत्वावर बहुभाषिकतेची भूमिका यावर चर्चा करण्यात आली.
२०२१ च्या भाषिक सर्वे नुसार १२१ मातृभाषा आणि २२ सांविधानिक दर्जा असलेल्या भाषांचा समावेश असलेला भारताचा अनोखा सामाजिक-सांस्कृतिक परिचय या कार्यशाळेचा केंद्रबिंदू होता, ज्यामध्ये भाषिक प्रक्रिया भाषा-मिश्रणापासून ते बहुभाषिकता शिक्षण आणि तंत्रज्ञानावर होणारा परिणाम यावर चर्चा करण्यात आली. पहिल्या दिवशीचे सत्र भाषा मिश्रण आणि भाषा बदल यांसारख्या भाषिक प्रक्रियांवर चर्चा करणारे प्रो प्रमोद पांडे यांनी घेतले. डॉ उज्ज्वला बर्वे, यानी माध्यम आणि बहुभाषिकतेचा छेदनबिंदू शोधला. प्रा रामचंद्र भावसार यांनी भाषेच्या वापरावर डिजिटल नवकल्पनांचा प्रभाव या विषयावर भाषण देऊन चर्चा केली. दुसऱ्या दिवशी डॉ डी वसंता यांनी मनोभाषिक दृष्टीकोनांचा अभ्यास केला, भारतातील बहुभाषिकतेची पाश्चात्य संदर्भांशी तुलना केली, तर संभाजी जाधव यांनी तंत्रज्ञान आणि बहुभाषिकतेवर क्रियाकलाप आधारित सत्र सादर केले.
तिसऱ्या दिवसापासून पाचव्या दिवासपर्यंत विविध विषयांवर अभ्यासपूर्ण सत्र चालू राहिले. डॉ अनघा भट यांनी कविता आणि शिक्षणातील बहुभाषिकतेवर चर्चा केली, त्यानंतर डॉ अजित मोहंती यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व बहुभाषिकता या विषयावर व्याख्यान झाले. प्रा सोनल कुलकर्णी-जोशी यांनी चौथ्या दिवशी भाषिक भौगोलिक दृष्टिकोणाचा शोध विविध उदहरणातून घेतला, तर डॉ राहुल म्हैसकर यांनी आकर्षक उपक्रमांद्वारे लिपि या विषयावर प्रकाश टाकला. शेवटच्या दिवशी प्रा रमेश धोंगडे यांनी सामाजिक आणि शैक्षणिक पैलुमध्ये बहुभाषिकतेवर लक्ष केंद्रित केले, इंग्रजी आणि मराठी यांच्यातील संबंध यावर व्यावहारिक उदाहरणे दिली.
कार्यशाळेचा समारोप सत्रात डॉ सुजाता वरदराजन, प्रा सोनल कुलकर्णी-जोशी, भार्गव वलंजू, मयुरी जाधव, आणि डॉ राहुल म्हैसकर उपस्थित होते. या कार्यशाळेत एकूण 22 स्पर्धक उपस्थित होते आणि सहभागींच्या प्रतिक्रिया आणि प्रमाणपत्र वितरण समारंभाने कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राहुल म्हैसकर आणि सहसंयोजक सतीश बांगर यांनी केले.
या पाच दिवसीय कार्यक्रमाने सहभागींना बहुभाषिकतेच्या गुंतागुंतीच्या जगात मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान केली आणि भारतातील आणि त्यापलीकडे तिच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि तांत्रिक परिणामांवर जोर दिला.