डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ समारोपीय कार्यक्रम संपन्न
अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे दिनांक ०१ ते ०७ सप्टेंबर दरम्यान “राष्ट्रीय पोषण सप्ताह” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रम अधिष्ठाता डॉ अनिल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 09 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. व्यासपीठावर वैद्यकीय अधिक्षक डॉ पवन टेकाडे उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ देशमुख यांनी राष्ट्रीय पोषण सप्ताह हा निरंतर घेतला तरच त्याचा समाजाला फायदा होईल कारण तरूण पिढी जंकफूड व फास्टफूडच्या विळख्यात पूर्णतः अडकत आहेत व यासाठीच आहाराविषयक मार्गदर्शनाची नियमित आवश्यकता आहे.
आहारतज्ञ डॉ उज्वला बी ढेवले यांनी संपूर्ण सप्ताहाच्या कार्यक्रमाचा अहवाल वाचन केले. या महिन्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘तेल व तूप वापरतांना!’ या विषयावर घोषवाक्य प्रदर्शनीचे आयोजन, ‘स्तनपान करणाऱ्या मातांचा दैनंदिन आहार’ विषयावर बालरोग वार्डात पेशंट व नातेवाईकांना बालरोग विभागप्रमुख डॉ प्रतिभा काळे यांनी मार्गदर्शन केले. ‘प्रसुती पूर्व व पश्चात आहार कसा घ्यावा’ या विषयावर डॉ ढेवले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उप-वैद्यकीय अधिक्षक डॉ सोमेश्वर निर्मळ, रूग्णालय व्यवस्थापक ऋग्वेद देशमुख, नर्सिंग इनचार्ज सुषमा गढवाले, व्दारका घोंगडे, सोशल वर्कर भुमिका कोळंबे तसेच डॉक्टर्स, विद्यार्थी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुषा देशमुख यांनी केले.