ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात लिंगभाव प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना पद्वयुत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ सप्टेंबर रोजी
लिंगभाव प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील स्त्रियांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये स्त्री- पुरुष समानतेचे मूल्य रुजावे व स्त्रियांप्रती आदरभाव असणारे सुदृढ समाजमन घडविण्याच्या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील अभ्यासक सुरज पवार हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. तसेच प्रा भारती गोरे व प्रा दासू वैद्य हे उद्घाटन व समारोप सत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन करतील. या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्राच्या संचालक डॉ निर्मला जाधव तसेच समन्वयक डॉ अश्विनी मोरे यांनी केले आहे.