सौ के एस के महाविद्यालयात स्वयंनिर्वाही अभ्यासक्रमास प्रवेश सुरू
बीड : नवगण शिक्षण संस्थेच्या सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आजीवन शिक्षण व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू आहे.
या अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र कोर्स किमान दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्यानुसार स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी व नौकरीच्या विविध संधी मिळावी म्हणून त्यात दुग्ध व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सहा महिने), बालवाडी, अंगणवाडी प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सहा महिने), विक्री प्रतिनिधी प्रमाणपत्र अभ्यासक्रम (दोन महिने), सौंदर्य संवर्धन व व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सहा महिने), तर किमान बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण पत्रकारिता (सहा महिने), ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र (तीन महिने), सर्टीफिकेट कोर्स इन कम्युनिकेटीव्ह इंग्रजी (सहा महिने) या अभ्यासक्रमाना प्रवेश देणे सुरू असून अनुक्रमे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सदरील विषयाच्या प्रवेशासाठी अर्ज करावे.
महाविद्यालयाचे डॉ अशोक डोंगरे (समन्वयक) मो क्र 9423716941 यांच्याशी संपर्क साधावा व प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ खान ए एस, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर यांनी केले आहे. तर वरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यांच्याशी संपर्क साधावा.