शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा
तंत्रज्ञानातच शिक्षकांच्या सक्षमीकरणाचा मार्ग – डॉ कृष्णा पाटील
कोल्हापूर : ज्या शिक्षकाला विषयाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान माहित आहे, तो शिक्षक सक्षम असतो. त्यामुळे तंत्रज्ञानातच शिक्षकांच्या सक्षमीकरणाचा मार्ग आहे. असे प्रतिपादन दूरशिक्षण व ओंनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ कृष्णा पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिक्षकांचे सक्षमीकरण याविषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव व्ही बी शिंदे होते. यावेळी सर्व समन्वयक आणि सहा प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ पाटील म्हणाले की, शिक्षक कौशल्य,वृत्ती व ज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत व सक्षम असला पाहिजे. शिक्षक दिन हा आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे.आपले सहकारी, एखादे पुस्तक, मित्र, एखादे वाक्य,एखादा आशय आपल्या जीवना मध्ये बदल घडवू शकतो.त्यामुळे आपली शिकण्याची वृत्ती असली पाहिजे.
कोरोना नंतर शिक्षण क्षेत्रात अनेक अमुलाग्र बदल झालेले आहेत.तंत्रज्ञानच तंत्रज्ञान शिकवत असल्याने शिक्षकांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. युट्युब वरील व्हिडीओ कसा बनवायचा याची माहिती व्हिडीओ पाहण्यातून मिळतो. शिक्षकांना प्रवेश ते मूल्यमापन करताना अनेक माध्यमांचा वापर करावा लागतो. त्यामुळे नव नवीन माध्यमांचा वापर करायला शिक्षकांनी शिकले पाहिजे. जिज्ञासा आणि सृजनशीलता शिक्षकांनी अंगिकारले पाहिजेत. असे मत डॉ पाटील यांनी केले.
शिंदे म्हणाले की,शिक्षकांचे सक्षमीकरण होण्यासाठी विविध टप्प्यावर स्वतः मध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी अध्यापक विकसन कार्यक्रम यामध्ये शिक्षकांनी सहभाग घेतला पाहिजे ज्ञान हि आपली संपत्ती आहे. त्याचे वाटप केले पाहिजे.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ प्रकाश बेळीकट्टी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ नितीन रणदिवे यांनी केले व बबन पाटोळे यांनी आभार मानले.