पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राजे उमाजी नाईक जयंती साजरी
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, शिवाजीनगर येथे लोक प्रशासन विभागाद्वारे आयोजित राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इतिहास विभागाचे प्रा गोविंद फड यांनी राजे उमाजी नाईक यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या गौरवशाली कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना राजे उमाजी नाईकासारखे शूर वीरांची इतिहासाने पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नसल्यामुळे, राजे उमाजी नाईक यांचे कार्यकर्तृत्व इतिहासात ठळकपणे अधोरेखित झालेले नाही, यावर अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रकाश टाकला. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस आर मंझा, उपस्थित होते. लोकप्रशासन विभागाचे प्रमुख प्राध्यापक दिगंबर गंगावणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ स्वाती नरवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जानवी शिंदे या विद्यार्थिनींनी केले तर या कार्यक्रमाकरिता, राजू मोरे व यश खाडवे, मुदसशीर बेग, आदित्य बिंद विद्यार्थिनी परिश्रम घेतले.