सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय नागपूर द्वारा हिंगणा येथे शांतता मार्चचे आयोजन संपन्न
रायपूर हिंगणा येथून सुरु झालेला शांतता मार्चचे वानाडोंगरी येथे समापन
नागपूर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित, सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय, नागपूर च्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी ०६ सप्टेंबर २०२४ रोजी महिला सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शांतता मार्चचे आयोजन करण्यात आले.
रायपूर हिंगणा येथून सुरु झालेला शांतता मार्चचे वानाडोंगरी येथे समापन झाले. या शांतता मार्चचा मुख्य उद्देश कोलकत्ता व बदलापूर येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात व महिला सुरक्षेविषयी जागरूकता तसेच समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हा होता. या मार्चचे नेतृत्व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रूपा वर्मा यांनी केले. या शांतता मार्च मध्ये ३५० हून अधिक विद्यार्थिनी आणि ४५ हुन अधिक प्राध्यापक सहभागी झाले होते. या मार्चमध्ये सहभाग झालेल्यांनी शांतता, न्याय आणि कोलकात्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहयोगी कृतीचे समर्थन करणारे संदेश असलेले बॅनर आणि फलक हातात घेतले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रूपा वर्मा यांनी या कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाल्या, “आरोग्य सेवा व्यावसायिक या नात्याने, केवळ वैद्यकीय सेवा पुरवणेच नव्हे तर शांतता आणि समाजकल्याणाचा पुरस्कार करून आदर्श निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे.
या शांतता मार्चने नर्सिंग व्यावसायिकांच्या केवळ आरोग्य सेवेतच नव्हे तर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी समुदाय नेते म्हणूनही भर दिला. प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि एकात्मतेचे महत्त्व प्रतिबिंबित करून सहभागींनी शांततेत रौली काढली.
महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ रुपा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका करिश्मा ढोक (NSS अधिकारी) यांनी यशस्वीरित्या या मार्चचे आयोजन केले.