अमरावती विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात शिक्षक दिन आणि दीक्षारंभ समारोह संपन्न
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथील भौतिकशास्त्र विभागात नुकताच शिक्षक दिन आणि दीक्षारंभ समारोह संपन्न झाला. आपल्या जीवनात शिक्षक आणि शिक्षणाचे महत्व, भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्नण यांची जयंती, तसेच नवीन आलेले विद्यार्थी यांची भौतिकशास्त्र विभाग व विभागाचे कर्मचारी यांच्याशी ओळख या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात आला. हा समारोह भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा डॉ संदीप वाघुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
विभागप्रमुख डॉ संदीप वाघुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून जीवनात शिक्षकांची उपस्थिती किती मोलाची असते हे सांगितले. सोबतच त्यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना भौतिकशास्त्र विभागाची संपूर्ण माहिती दिली. भौतिकशास्त्र विभागातील डॉ गजानन मुळे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या शब्दात अमूल्य मार्गदर्शन केले. विभागातील प्रा अक्षय बांगर, प्रा सुरज तायडे, प्रा श्वेता वाघमारे, प्रा अभिजीत धालस्कर, प्रा प्रियांका गोळे, प्रा व्ही ए लोडे, प्रा भोरजार, प्रा राठोड, प्रा शेख सोहेल आदींनी विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य यावर पथप्रदर्शन करीत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे आयोजन भौतिकशास्त्र ग्द्मड़ भाग 2 च्या विद्यार्थ्यांनी जबाबदारीपूर्वक पार पाडले, तथापी एम एस्सी भाग एकच्या विद्यार्थ्यांनी मनोगत सादर केले.
समारोहाची सुरवात मान्यवराद्वारे वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा व भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमापूजन व विदयापीठ गीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन एम एस्सी भाग 2 चा विद्यार्थी विवेक येवले आणि विद्यार्थिनी मनीषा शेवाळे यांनी, तर आभार प्रदर्शन साक्षी चोपकर हिने मानले. कार्यक्रमाला विभागाचे सर्व सन्माननीय शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी आणि एम एस्सी भाग १ व २ चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.