श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यशाळा संपन्न
युवकांनी विधायक ऊर्जेचा वापर राष्ट्र उभारणीसाठी करावा – प्रा डाॅ सच्चिदान॑द खडके यांचे प्रतिपादन
परभणी : आजचे युवक देशाचे उद्याचे भविष्य असतात. भारताचे भविष्य युवकांच्या खांद्यावर असल्याने आपल्यातील विधायक उर्जेचा वापर राष्ट्र उभारणीसाठी करावा असे प्रतिपादन प्रा डॉ सच्चिदानंद खडके यांनी शुक्रवारी (दि ३०) रोजी केले. परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी होते. तर मंचावर उपप्राचार्य प्रा नारायण राऊत, कार्यक्रमाधिकारी डॉ तुकाराम फिसफिसे, डॉ दिगंबर रोडे, प्रा सविता कोकाटे, प्रा शरद कदम, प्रा राजेसाहेब रेंगे, प्रा विलास कुराडकर उपस्थित होते.
यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना डॉ खडके पुढे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या राबविल्या जाणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना विधायक कार्यात सहभागी करून घेता येते तसेच इतिहास घडविण्यासह समाजात मानवता रूजविण्याचे काम रासेयो स्वयंसेवकच चांगल्याप्रकारे करू शकतात असेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी यांनी अभ्यासाला पुरक उपक्रमही महत्वाचे असतात कारण यामधून जे शिक्षण मिळते ते वर्गात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा वेगळे असते. राष्ट्रीय सेवा योजनेतून कृतीशील, अनुभवजन्य शिक्षण मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे उद्घाटन वृक्षाला विद्यार्थीनीच्या हस्ते राखी बांधून अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ तुकाराम फिसफिसे सुत्रसंचलन प्रकाश ढाले तर आभार प्रा विलास कुऱ्हाडकर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डाॅ डिगबऺर रोडे, प्रा राजेसाहेब रेंगे, डाॅ विजय परसोडे, सुरेश पेदापल्ली, सय्यद सादिक, अच्युत तरफडे आदींनी प्रयत्न केले. सदरील कार्यशाळेस राष्ट्रीय सेवा योजनेचे २७५ विद्यार्थी उपस्थित होते.