डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये योग अभ्यास वर्गाला उत्साहात सुरुवात
पिंपरी : डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (DYPMC) पिंपरी, पुणे येथे योग सत्राला उत्साहात सुरुवात झाली. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत सर्वांगीण निरोगी आरोग्याला चालना देण्यासह शाश्वत जीवनासाठी योगास प्रोत्साहन देणारे परिणामकारक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने योग प्रोटोकॉल प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. या वर्षीची संकल्पना ,”स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” ही आहे. योग दिनाचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर योगाचा सखोल प्रभाव अधोरेखित करणे हे आहे.
सामान्य योग प्रोटोकॉल हा योग आसनांचा, श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा आणि ध्यान पद्धतींचा वैज्ञानिकदृष्ट्या विकसित केलेला संच आहे. जो केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेने (CCRYN) विकसित केला आहे. हा प्रोटोकॉल भारत सरकारने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन (22 जून) सुरू झाल्यापासून सर्व देशांना प्रदान केला आहे
त्या अनुषंगाने योग सत्रामाध्यमातून निरोगी प्रौढांच्या मेंदूच्या कार्यावर योगाचे मुल्याकंन हे संशोधन देखील पूर्ण करण्यात येत आहे. यामध्ये डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डीआयटी) च्या प्राध्यापकांच्या तुकडीने या संशोधनात सहभागी होण्यासाठी योग अभ्यास सुरू केले.
डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल च्या सहकार्याने संशोधन अभ्यासामध्ये एकूण 138 निरोगी प्रौढांचा समावेश आहे. त्यांना 45 दिवसामध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली सामान्य योग प्रोटोकॉलचा सराव करण्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात येते. 45-दिवसांच्या सरावाच्या आधी आणि नंतर मेंदूच्या निवडक कार्यांचे मूल्यांकन करण्यासाठी अभ्यासातील सहभागी मनोवैज्ञानिक चाचण्या घेतात, तर काही सहभागींना न्यूरल नेटवर्क कनेक्टिव्हिटीचे मूल्यांकन करण्यासाठी मेंदूच्या FMRI साठी निवडले जाते. या आगोदर हा अभ्यास ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि आतापर्यंत नर्सिंग, दंतचिकित्सा, प्रशासन आणि सुरक्षा यासारख्या विविध पार्श्वभूमीतील 101 सहभागींची नोंदणी केली होती.
डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डीआयटी) मधील प्राध्यापकांच्या उपस्थिती उत्साहात सुरुवात झाली. डीआयटीचे प्राचार्य डॉ ललित कुमार वाधवा यांनी सत्राचे उद्घाटन केले आणि सहभागींना नियमितपणे योगाभ्यास करण्यास प्रोत्साहित केले.
हा योगाभ्यास वर्ग डॉ डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ सोमनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व स्टाफने ‘निरोगी आरोग्यसाठी योग’ हा संकल्प करून योगाभ्यासाचा हा संकल्प पूर्णत्वास घेऊन जात आहेत.
डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील, प्र-कुलपती डॉ भाग्यश्रीताई पी पाटील यांनी सहभागी सर्वांचे कौतुक करीत त्याचे मनोबल वाढविले.
डॉ चंद्रकांत शेंडे, डीआयटीचे मुख्य ग्रंथपाल योग अभ्यासाचे संयोजन केले. डॉ सारिका चतुर्वेदी, शास्त्रज्ञ आणि DYPMC मधील अभ्यासाच्या प्रमुख अन्वेषक आणि योग शिक्षक व्यंकट रचलवार उपस्थित होते. डॉ जे एस भवाळकर अधिष्ठाता डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज यांनी योग अभ्यासाला शुभेच्छा दिल्या तसेच या उपक्रमासाठी हॉस्पिटलकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे वचन दिले. अभ्यासाचे सह अन्वेषक प्रा डॉ शैलेश रोहतगी आणि न्यूरोलॉजी विभागातील डॉ प्रज्वल राव या प्रकल्पात सहभागी आहेत.
या अभ्यासाला केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद, आयुष मंत्रालय, भारत सरकारचे योगदान लाभले आहे.