शिवाजी विद्याठामध्ये इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : इन्स्टियुट ऑफ चार्टड अकौंटट; आयसीएआय कोल्हापूर जिल्हा नागरी बैंक्स सहकारी असोसिएशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बँकामधील अध्यक्ष, सीए संचालक व लेखापरिक्षक यांच्याकरिता शिवाजी विद्यापीठामध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये मुंबई येथील नामांकीत चार्टड अकौंटंट यांचे मार्फत बॅकांच्या लेखापरिक्षणा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुरूवातीस बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी स्वागत केले व बैंक ऑफ इंडिया चेअरचे डॉ राजन पडवळ यांनी प्रास्ताविक केले.

Advertisement

या सेमिनार मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधदुर्ग, व बेळगाव जिल्हयातील नागरी सहकारी बैंकाचे १५० प्रतिनिधी उपस्थित होते. नागरी सहकारी बँकासाठी अशी कार्यशाळा प्रथमच आयोजित केलेली होती. या कार्यशाळेमध्ये सीए अभय कामत, मुंबई यांनी लेखामानके आणि प्रगटीकरण निकषांचे अनुपालन करणारी आव्हाने, सीए धनंजय गोखले मुंबई यांनी सिस्टिम बेस एनपीए/आयआरएसीपी मधील आव्हाने, सीए सचिन आंबेेकर मुंबई यांनी सीआरएआर/ कोषागार लेखापरिक्षण, बीआर ॲक्ट व सहकारी संस्था कायद्याअतर्गत नियमाचे अनुपालन, सीए निरंजन जोशी मुंबई यांनी वैधानिक लेखापरिक्षण अहवाल एलएफएआर आणि प्रमाणपत्रे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये खुल्या चर्चासत्रामध्ये तज्ञ समिती म्हणून वरील चार्टड अकौटटस तसेच सीए दिपक गाडवे, प्रशांत गंभीर, मुख्य कार्यकारी अधिकारी व नागरी सहकारी बँकांचे प्रतिनीधी तसेच बैंकाचे वैधानिक लेखापरिक्षक यांनी भाग घेतला. उपस्थित केलेल्या शकांचे तज्ञ समिती मार्फत शंका समाधान करणेत आले.

—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page